२३ हजार शेतकऱयांच्या हातावर शासनाच्या 'तूरी'

हरी तुगावकर
शुक्रवार, 18 मे 2018

एकूणच या वर्षी हमी भावाने तूर खरेदी योजनेचा बोजवारा उडाला आहे. या योजनेला शासन मुदतवाढ देणार का याकडे आता शेतकरयांचे लक्ष लागले आहे. यावर्षीही जिल्हा व परिसरात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. 

लातूर : गेल्यावर्षी तूर खरेदीत रेकॉर्ड ब्रेक करणाऱया शासनाने यावर्षी मात्र तूर खरेदीतून शासनाने काढता पाय घेतला आहे. आता तर खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत. जिल्ह्यात आॅनलाईन नोंदणी करूनही २३ हजार शेतकऱयांची
तूरच शासनाने खरेदी केली नाही. तर दुसरीकडे खरेदी केलेल्या साडेतीन हजार शेतकऱय़ांचे अद्याप २६ कोटी रुपयेही शासनाकडे थकले आहेत.

एकूणच या वर्षी हमी भावाने तूर खरेदी योजनेचा बोजवारा उडाला आहे. या योजनेला शासन मुदतवाढ देणार का याकडे आता शेतकरयांचे लक्ष लागले आहे. यावर्षीही जिल्हा व परिसरात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. 

शासनाने यावर्षी तुरीसाठी पाच हजार ४५० रुपये हमी भाव जाहीर केला होता. या हंगामात पहिल्यापासूनच बाजारात हमी भावापेक्षा एक हजार ते बाराशे रुपये कमी दर राहिले आहेत. यात शासनाने फेब्रुवारीपासून हमी भावाप्रमाणे तूर खरेदी केंद्र सुरु
केले. हमी भाव तरी मिळेल. या आशेने ४० हजारांवर शेतकऱयांनी याकरीता आॅनलाईन नोंदणी केली. पण शासनाने या शेतकऱयांना ठेंगाच दाखविला आहे.

खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर गेल्या तीन साडेतीन महिन्यात केवळ १७ हजार ८६२ शेतकऱयांची दोन लाख एक हजार क्विंटल तूर खरेदी केली आहे. यापैकी १४ हजार १९ शेतकरय़ांना ८३ कोटी
५५ लाख रुपये पेमेंट केले आहे. तीन हजार ८८० शेतकऱयांचे २६ कोटी रुपये पेमेंट शासनाकडे थकले आहे. तूर देऊन पैसे मिळत नाही तर दुसरीकडे २३ हजार शेतकऱयांची तर तूरच खरेदी करण्यात आलेली नाही. या शेतकऱयाना आता हमी भावापेक्षा कमी भावाने बाजारात तूर विक्रीची वेळ आली आहे. शासन या योजनेला मूदत वाढ देणार का, याकडे शेतकऱयांचे लक्ष लागले आहे.

आॅनलाईन नोंद केलेले शेतकरी संख्या--४०,७३७
मॅसेज पाठवलेल्या शेतकरी संख्या--१९,५९८
तूर खरेदी करण्यात आलेल्या शेतकऱयांची संख्या--१७,८६२
पेमेंट केलेल्या शेतकऱयांची संख्या---१४०१९
शासनाने केलेले एकूण पेमेंट----८३ कोटी ५५ लाख
पेमेंट न केलेल्या शेतकऱय़ांची संख्या--३८८०
एकूण थकलेले पेमेंट----२६ कोटी १७ लाख

लातूर जिल्ह्यातील शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर तूर देऊनही अद्यापपर्यंत पेमेंट न मिळालेल्या शेतकऱयांची संख्या व एकूण थकलेले पेंमेंट पुढील प्रमाणे :-

खरेदी केंद्राचे नाव - पेमेंट थकलेल्या शेतकरयांची संख्या - थकलेले पेमेंट
लातूर------२५----------------७३,५२,०५०
उदगीर-----२२८---------------१,५६,३६,०५०
अहमदपूर----५४६---------------४,०५,६४,३५०
औसा------१२०९---------------८,३८,४२,८००
रेणापूर-----२०७----------------१,२२,२४,३५०
देवणी-----६७-----------------५५,९७,१५०
चाकूर-----८१३------------- -४,६५,३२,१००
लोणी------१५५-------------१,१८,९७,३५०
साकोळ-----३०६-------------१,९१,६७,६५०
जळकोट---३२४--------------१,८९,२२,४००
---------------------------------
एकूण----३८८०---------------२६,१७,३६,२५०
-----------------------------------

Web Title: Government's Turi on the hands of 23 thousand farmers