राज्यपालांचे दत्तक गाव जवरला भ्रष्टाचाराच्या विळख्यात

राज्यपालांचे दत्तक गाव जवरला भ्रष्टाचाराच्या विळख्यात

नांदेड : राज्यपाल यांनी दत्तक घेतलेलं किनवट तालुक्यातील जवरला या गावात मागील तीन वर्षात झालेल्या कामात भ्रष्टाचार झाला होता. त्याची चौकशी करीता विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये चार सदस्यांचा सहभाग आहे. या भ्रष्टाचारप्रकरणी सुराज्य सेनेचे योगेश जाधव यांनी जनआंदोलन छेडले होते. 

राज्यपाल यांनी दत्तक घेतलेल्या जवरला या गावात विविध विकासकामे हाती घेण्यात आले होते. राज्यपाल पदाची शपथ घेता त्यांनी आदिवासी भागातील किनवट मधील जवरला हे गाव दत्तक घेऊन त्या गावाला दोन वेळेस त्यांनी भेट दिली. मोठा निधी पुरविण्यात आला होता. मात्र करण्यात आलेल्या सर्वच कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सुराज्य सेनेच्या वतीने तक्रार केली होती. यासाठी त्यांनी मागील महिन्यात 24 सप्टेंबरला किनवट येथे उपोषण करून आदिवासी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी केली होती.

सरकार पोर्टरवरील तक्रारीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले. ग्रामपंचायत जवरला (किनवट) येथील गेल्या तीन वर्षात सन 2015 ते 2017 या कालावधीत विविध विकास कामे कागदोपत्री दाखविण्यात आले. परंतु तक्रारकर्त्यांच्या मागणीवरून झालेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी जोर धरु लागल्याने अखेर किनवट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी उच्चस्तरीय चौकसी समिती गठीत केली. ही समिती येत्या एक महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल देणार असल्याचे सांगितले. तसा पत्रव्यवहार त्यांनी तक्रारकर्ता, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना केला आहे. समितीत किनवट उपविभागीय कार्यालयातील उप अभियंता (बां) आर. एम. कडेमवार, शाखा अभियंता आर. एम. देशपांडे, सय्यद आणि एस. आर. शिंदे यांचा सहभाग आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com