जितेंद्र अभ्यंकरांच्या बहारदार गायनाने भरली रंगत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

पंधराव्या गोविंदभाई श्रॉफ स्मृती संगीत महोत्सवाचा समारोप
औरंगाबाद - पंधराव्या गोविंदभाई श्रॉफ स्मृती संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध गायक जितेंद्र अभ्यंकर यांचे गायन रंगले. आपल्या जादुई आवाजाने त्यांनी सादर केलेल्या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

दोनदिवसीय महोत्सवाचा शनिवारी (ता. 24) समारोप झाला. सरस्वती भुवनच्या हिरवळीवर महोत्सवाचे दुसरे पुष्प जितेंद्र अभ्यंकर, राधा मंगेशकर यांच्या सुगम गायनाने गुंफण्यात आले. श्री. अभ्यंकर यांनी गणेश वंदनेने गायनास सुरवात केली. त्यानंतर राधा मंगेशकर यांनी "केव्हा तरी पहाटे' हे गीत सादर केले. त्यानंतर "पाहिले ना मी तुला' हे गीत सादर करून आपल्या जादुई आवाजाची अनुभूती रसिकांना दिली. त्यानंतर राधा मंगेशकर यांनी "शारद सुंदर चंदेरी राती' हे गीत सादर केले. त्यानंतर राधा आणि जितेंद्र अभ्यंकर यांनी "माळ्याच्या मळ्यात कोण गं उभी' हे गीत सादर करीत कार्यक्रमात रंगत भरली. नटरंग चित्रपटातील अजय-अतुलचे "खेळ मांडला' या गीताचे सादरीकरण करीत कार्यक्रमात रंगत भरली. त्यानंतर ढोलकी आणि तबल्याची जुगलबंदी सादर झाली. त्यानंतर राधा मंगेशकर यांचे पिंजरा चित्रपटातील "तुम्हावर केली मी मर्जी बहाल' हे गीत सादर केले. कलाकारांना मंदार देव (सिंथेसायझर), यश भंडारी (ऑक्‍टोपॅड), अभय इंगळे (तबला), विशाल गंडद्वार यांनी साथसंगत केली. सोनाली श्रीखंडे यांनी निवेदनाची बाजू सांभाळली. सूत्रसंचालन केतकी तुळपुळे यांनी केले.

Web Title: govindbhai shraf smruti sangeet mahotsav