Gram Panchayat Election: वयाच्या 60 व्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात; 40 वर्षांपासून विजयी

शिवशंकर काळे | Monday, 4 January 2021

सरपंचपदाचे आरक्षण आपल्याला सुटले असल्याने वयाची पर्वा न करता त्यांनी पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला

जळकोट (जि.लातूर) : तब्बल 40 वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूकीत सदस्य म्हणून निवडून आलेले उमेदवार वयाच्या साठाव्या वर्षी पुन्हा ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी उभे राहिले आहे. त्यामुळे राजकारणाची गोडी लागलेल्या माणसाला राजकारणाचे वेढ किती असते यावरून दिसून येत आहे.

सोनवळा ता.जळकोट येथील बाबुराव सुर्यवंशी वय वर्षे साठ. सुर्यवंशी हे गावातील वार्ड क्रंमाक 1 मध्ये तब्बल चाळीस वर्षापासून ग्रामपंचायत निवडणूक लढत आले आहेत. आता त्यांनी सन 2021 मध्ये होत असलेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

गेवराई तालुक्यात हायवा ट्रकने शेतकऱ्याला चिरडले, गावकऱ्यांनी सुरु केले ठिय्या आंदोलन

Advertising
Advertising

यापूर्वी सोनवळा ता.जळकोट ग्रामपंचायतीचे आरक्षण हे अनुसूचीत जातिसाठी सुटले होते. सरपंचपदाचे आरक्षण आपल्याला सुटले असल्याने वयाची पर्वा न करता त्यांनी पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निवडणूक आयोगाने पूर्वीचे आरक्षण रद्द करून मतमोजणीनंतर आरक्षण सोडत होणार असल्याची घोषणा झाली. पंरतु सुर्यवंशी यांना यांचे कोणतेही दुख: झाले नाही.

औरंगाबादच्या नामांतरावर अजित पवार बोलले...

आपली ही शेवटची लढाई असून आपण ही जिंकणारच या आशेने त्यांनी उमेदवारी अर्ज भरुन प्रचाराला लागले आहेत.विशेष म्हणजे ज्या पँनलकडून ते थांबत होते त्या पँनलचा एकदाही सरपंच झाला नाही तरीही राजकारणाचे वेढे असलेल्या श्री.सुर्यवंशीना शेवटची लढाई लढण्याची जिद्द अजूनही अंगात आहे.

(edited by- pramod sarawale)