उद्या 508 पैकी किती जणांचे भवितव्य उजळणार? सकाळी दहापासून मतमोजणी

result
result

जळकोट (लातूर): तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या 203 जागेचीसाठी 508 उमेदवारांनी आपले भवितव्य अजमवले आहेत. सोमवारी यापैकी किती जणांचे भवितव्य उजळणार हे दुपारी दोन पर्यंत स्पष्ट होणार आहे. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी यांच्या उपस्थित तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीसाठी 15 तारखेला शांततेत मतदान प्रक्रिया संपली. तहसील कार्यालयात सकाळी दहा पासून मतमोजणी सुरु होणार आहे. मतमोजणीसाठी 9 टेबल असून 9 फेरीत मतमोजणी होणार आहे. मतमोजणी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. दुपारी दोन नंतर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर होणार आहे.

मतमोजणीवेळी उमेदवार आणि उमेदवारांच्या एंजट उपस्थित राहणार आहे. दोघानीही मतमोजणी वेळी सोबत तहसिल कार्यालयाने दिलेले ओळखपञ, आधार कार्डसोबत घेऊन यायचे आहे. इतर नागरिकांनी तहसिलदार कार्यालय परिसरात प्रवेश करता येणार नाही. उमेदवारांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी झाल्यास गुलाल, अथवा मिरवणूक, फटाके आदिसाठी आचारसंहिता असल्याने यांचे उल्लघंन होणार नाही यांची दक्षता घेण्याचे आवाहन तहसीलदार संदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

मतमोजणीसाठी  9 टेबल असून, 43 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीवेळी अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी 25 पोलिसांची टीम तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी सांगितले.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com