ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन अखेर मागे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

बीड - कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षे सेवाकाल नियमित करावा यासह इतर पंधरा प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील ग्रामसेवक पंधरा दिवसांपासून संपावर होते. त्यामुळे ग्रामपंचायतीची कामे ठप्प झाली होती. याची दखल घेत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी (ता. तीन) ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मागण्यांबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे ग्रामसेवकांनी आंदोलन मागे घेतले असून, सोमवारपासून ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत सुरू होणार आहे.

कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षे सेवाकाल नियमित करावा, ग्रामसेवक यांना दरमहा प्रवासभत्ता पगारासोबत देण्यात यावा, ग्रामसेवक संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल करून ती पदवीधर करण्यात यावी, सन 2011 च्या लोकसंख्येवर आधारित सज्जे व पदे निर्माण करण्यात यावेत, ग्रामसभेची संख्या मर्यादित असावी, नरेगाकरिता स्वतंत्र यंत्रणा करण्यात यावी, ग्रामसेवक संवर्गाकरिता वैद्यकीय कॅशलेस सुविधा देण्याचा निर्णय घ्यावा, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात यावा, सोलापूर येथील 239 ग्रामसेवकांवरील कारवाई मागे घेण्यात याव्यात आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभरातील ग्रामसेवकांनी 7 नोव्हेंबरपासून असहकार व 17 नोव्हेंबरपासून "काम बंद' आंदोलन सुरू केले होते. याची दखल घेत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी मुंबई येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे शनिवारपासून ग्रामसेवकांनी आंदोलन मागे घेतले असून, सोमवारपासून ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत चालणार आहे. शनिवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीला संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे, प्रशांत जामोदे, एन. के. कुंभार, हंबीरराव पाटील, के. टी. सिताप, सुखदेव वाडकर, ए. एस. कटारे आदी उपस्थित होते.

मुख्य पंधरा मागण्यांसाठी आमचे मागील पंधरा दिवसांपासून "काम बंद' आंदोलन सुरू होते. शनिवारी मुंबई येथे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे आंदोलन मागे घेतले आहे. सोमवारपासून सर्व कामे सुरळीत होतील.
- नारायण बडे, जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक संघटना, बीड

Web Title: Gramsevak work close agitation stop