आजीचा गळा दाबून नातवाने पळविले तीन लाख

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 18 मे 2019

नांदेड : आजीला घरात गाठून गळा दाबून पावणेतीन लाखाचा एेवज लंपास केला. ही घटना येहळेगाव (ता. अर्धापूर) येथे गुरूवारी (ता. १६) दुपारी घडली. मात्र या प्रकरणी शुक्रवारी (ता. १७) गुन्हा दाखल करण्यात आला. 

नांदेड : आजीला घरात गाठून गळा दाबून पावणेतीन लाखाचा एेवज लंपास केला. ही घटना येहळेगाव (ता. अर्धापूर) येथे गुरूवारी (ता. १६) दुपारी घडली. मात्र या प्रकरणी शुक्रवारी (ता. १७) गुन्हा दाखल करण्यात आला. 

येहळेगाव येथील हरणाबाई जळबाजी कपाटे (वय ७५) ह्या आपल्या घरी एकट्याच घरकाम करीत होत्या. याचा फायदा घेऊन तिचा नातु चोरटा सुरेश कपाटे (वय २६) हा घरात आला. तिचा गळा दाबून धरून कपाटातील नगदी दोन लाख रुपये व सोन्याच्या तीन अंगठ्या असा पावणेतीन लाखाचा एेवज जबरीने चोरून नेला. हा प्रकार कुणाला सांगितला तर ठार मारण्याची धमकी दिली. भितीपोटी सदर वृध्द महिलेने या घटनेची वाच्यता केली नाही. पंरतु नंतर तीने आपल्या घरच्या मंडळीना सांगितल्याने तिला सोबत घेऊन नातेवाईकांनी अर्धापुर पोलिस ठाणे गाठले. तिच्या फिर्यादीवरुन सुरेश कपाटेविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार श्री. सावळे हे करीत आहेत. आरोपी सध्या फरार असल्याचे सावळे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grandchildren stoles grandmother s 3 lakhs