दिवाळी सुट्यांतही गजबजली शाळा

संजय कापसे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना दिवाळीच्या सुट्या असताना पुयना येथील जिल्हा परिषद शाळा मात्र विद्यार्थ्यांनी गजबजली आहे. दिवाळीनिमित्त शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले असून यामुळे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागली अाहे. येथील उपक्रमशील शिक्षक देविदास गुंजकर यांच्या उपक्रमांचे गावकरी कौतुक करत आहेत.

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना दिवाळीच्या सुट्या असताना पुयना येथील जिल्हा परिषद शाळा मात्र विद्यार्थ्यांनी गजबजली आहे. दिवाळीनिमित्त शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले असून यामुळे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागली अाहे. येथील उपक्रमशील शिक्षक देविदास गुंजकर यांच्या उपक्रमांचे गावकरी कौतुक करत आहेत.

तालुक्यातील पुयना येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. शाळेची विद्यार्थी संख्या ६४ असून शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे शाळेची उपक्रमशील शाळा म्हणून ओळख आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागली. विद्यार्थीही शाळेला दांडी मारत नाहीत. तसेच शाळेची गळती रोखण्यातही शाळेला यश आले आहे.

जिल्हाभरात सर्वच शाळांना दिवाळीच्या सुट्या लागल्या असताना पुयना शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय उपक्रमशील शिक्षक देविदास गुंजकर यांनी घेतला. या वेळी विद्यार्थ्यांना केवळ एक आठवड्याच्या सुट्या देण्यात आल्या. या सुटीच्या काळात श्री. गुंजकर यांनी शाळेची रंगरंगोटी करत शाळा डिजीटल करून घेतली. व एक नोव्हेंबरपासून शाळेत नियमित दिवाळी वर्ग घेत घेण्यास सुरवात केली. शाळेतील ६४ पैकीचाळीस विद्यार्थ्यांनी दिवाळी वर्गाला नियमित उपस्थिती लावली. दिवाळी वर्गामधून शिक्षक श्री. गुंजकर यांनी विद्यार्थ्यांकडून विषयांचा सराव, पुढील घटकांची तयारी, कॅप इंग्रजी कार्यक्रम, मूल्यशिक्षण आधारित व पाठ्य क्रमावर आधारित खेळ घेतले. तसेच अध्यापनासोबतच मराठी, गणित व बौद्धिक खेळातूनही विद्यार्थ्यांना अध्यापनात गुंतवून ठेवले. शिक्षक आपल्याशी थेट संवाद साधत शिकवित असल्याने विद्यार्थ्यांच्या मनातील शिक्षकांविषयी भितीही नाहीसी झाली आहे. त्यामुळे सकाळी शिक्षक येण्याअगोदरच विद्यार्थी शाळेत आलेले पहावयास मिळत अाहेत.  

इंग्रजी शाळेच्या तुलनेत शिक्षक
जिल्ह्यात इंग्रजी शाळेचे पेव फुटले आहे. सर्वसाधारण आर्थिक स्थिती असलेले पालकही आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत पाठविण्यावर भर देत आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांमुळे जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनिय झाली आहे. अशातही पुयना येथील शाळेत विद्यार्थी टिकून आहेत. त्यामुळे पालकांतूनही समाधान व्यक्त केले जाात आहे.    

गावकरी म्हणतात...
शिक्षक देविदास गुंजकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी लावली. सुटीच्या कालावधीत त्यांनी विद्यार्थ्यांना अध्यापन करून वेगळा पायंडा पाडला आहे.
-शिवाजी शिंदे पुयणेकर, सरपंच, पुयना

शिक्षक देविदास गुंजकर यांनी दिवाळीच्या सुट्यात शाळेची रंगरंगोटी करून विद्यार्थ्यांचे वर्ग घेतले. त्यांना शैक्षणिक कार्यात गुंतवून ठेवले आहे.
-गजानन टवले, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great school even during Diwali holidays