'ग्रीन लातूर वृक्ष टीम' करणार औसा शहर हरित, मोठी झाडे लावणार

औसा - ग्रीन लातुर टीमने हाश्मी चौक ते हनुमान मंदिर या प्रमुख मार्गाच्या दुभाजकात झाडे लाऊन संपूर्ण औसा शहर हरित करण्यास सुरुवात केली आहे.
औसा - ग्रीन लातुर टीमने हाश्मी चौक ते हनुमान मंदिर या प्रमुख मार्गाच्या दुभाजकात झाडे लाऊन संपूर्ण औसा शहर हरित करण्यास सुरुवात केली आहे.
Summary

मराठवाड्यात होणारी बेसुमार वृक्षतोड व नवीन झाडे लावण्यासंदर्भात असलेली अनास्था या नैसर्गिक आपत्तीला कारणीभूत असल्याचे लक्षात आल्याने लातुर येथील नगरसेवक इम्रान सय्यद आणि डॉ.पवन लड्डा या दोघांनी प्रथम लातुर शहरातील मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला, स्मशानभुमी, कब्रस्थान, शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात, दुभाजकात झाडे लावून लातुर शहराला हरित करण्याचा प्रयत्न केला.

औसा (जि.लातूर) : लातुर Latur शहर हरित करण्याचा संकल्प बांधलेल्या ग्रीन लातुर वृक्ष टीमने Green Latur Vruksa Team आता संपूर्ण महाराष्ट्रभर वृक्ष लागवडीचा विडा उचलला आहे. त्याच अनुषंगाने या टीमने रविवारी (ता.२०) औशात हाश्मी चौक ते हनुमान मंदिर या प्रमुख मार्गाच्या दुभाजकात झाडे लाऊन संपूर्ण औसा Ausa शहर हरित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे औसा शहराच्या सौंदर्यात तर भर पडणारच आहे. त्यापेक्षाही जास्त पर्यावरणाचा समतोल साधला जाऊन दुष्काळ निर्मूलनासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. २०१५ च्या भीषण दुष्काळाने Draught लातुर जिल्ह्यालाच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्याला Marathwada होरपळुन टाकले होते. मराठवाड्यात होणारी बेसुमार वृक्षतोड व नवीन झाडे लावण्यासंदर्भात असलेली अनास्था या नैसर्गिक आपत्तीला Natural Calamities कारणीभूत असल्याचे लक्षात आल्याने लातुर येथील नगरसेवक इम्रान सय्यद आणि डॉ.पवन लड्डा या दोघांनी प्रथम लातुर शहरातील मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला, स्मशानभुमी, कब्रस्थान, शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात, दुभाजकात झाडे लावून लातुर शहराला हरित करण्याचा प्रयत्न केला. आता हे दोघेही इतर शहरात वृक्ष लागवड करीत असून रविवारी औशात त्यानी वृक्ष लागवड सुरु केली आहे. येणाऱ्या काही दिवसात औसा शहरातील एमआयडीसी, ईदगाह मैदान, निलंगावेस ते बालाजी मंदिर मार्ग, शाळा महाविद्यालय परिसरात आठ फुटी मोठ्या झाडांची लागवड करणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत औसा शहर पूर्ण हिरवेगार होणार यात शंका नाही. औसा शहर हरित करण्याचा संकल्प बांधलेल्या या लातुरच्या टीमचे औसेकरांनी स्वागत केले आहे. त्यासाठी हवी ती मदत देण्यास औसेकर तयार आहेत. Green Latur Vruksa Team Starts Tree Plantation In Ausa

औसा - ग्रीन लातुर टीमने हाश्मी चौक ते हनुमान मंदिर या प्रमुख मार्गाच्या दुभाजकात झाडे लाऊन संपूर्ण औसा शहर हरित करण्यास सुरुवात केली आहे.
Yoga Day : योग दिनाच्या जनजागृतीसाठी औरंगाबादेत सायकल फेरी

तुम्ही खड्डा घ्या, आम्ही झाड लावू

औसेकरांना त्यांच्या घराच्या समोर अथवा घराच्या मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करावयाची असेल, तर त्यांनी एक फुट रुंद व दीड फूट खोल खड्डा तयार करुन द्यावा. आमची टीम त्या ठिकाणी झाड लावून देईल. हरित शहर करण्याची ही संकल्पना आमची टीम संपूर्ण महाराष्ट्रभर राबविली जाणार आहे. यात प्रथम बीड Beed, उस्मानाबाद Osmanabad, परभणी Parbhani, नांदेड Nanded, चंद्रपुर Chandrapur जिल्ह्यात वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलणार आहोत. दुष्काळाचे कायमचे निर्मूलन करावयाचे असेल तर त्याला शाश्वत वृक्ष लागवड करुन ती झाडे जोपासणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांनी सहकार्य करणे तेवढेच आवश्यक असल्याच्या भावना टीमचे सदस्य इम्रान सय्यद यांनी व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com