पावसामुळे अजिंठा डोंगरांना हिरवा शालू, रंगीबेरंगी वन्यफुलेही बहरू लागली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

जरंडी (औरंगाबाद) : सोयगावसह डोंगररांगांत झालेल्या सततच्या पावसाच्या रीपरीपीने सोयगावच्या वेताळवाडी जंगलाला वेढा घातलेल्या अजिंठा डोंगरांनी हिरवा शालू पांघरल्याने, सोयगावच्या जंगलाचे वैभव वाढले असल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हिरव्यागार गालिच्याने अजिंठा डोंगरांनी पर्यटकांना वेधून घेतले आहे. दरम्यान वेताळवाडीच्या जंगलातील विविध पर्णफुलेही बहरू लागल्याने जंगलातील वातावरण रंगांनी उधळून सुगंधाने बहरून गेल्याचे चित्र वेताळवाडीच्या जंगलात दिसून आल्याने श्रावण महिना आल्याचे पर्यटकांना भासत आहे.

सोयगावसह  परिसरात पावसाने दोन दिवसापासून रिपरिप चालू ठेवल्याने केवळ चारच दिवसात वेताळवाडीच्या जंगलाचे नुरूप पालटून गेले आहे. चार दिवसाच्या पावसात जंगलाचे वैभव वाढल्याने जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट देणारे पर्यटक वेताळवाडीच्या जंगलार्तून सैर करून रुद्रेश्वर लेण्यात आणि वेताळवाडीच्या किल्ल्याला भेट दिल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे वेताळवाडीच्या जंगलाचे सोंदर्य चारच दिवसात जगविख्यात झाले आहे. अजिंठ्याच्या डोंगरांनी परिधान केलेला हिरवा शालू आणि बहरलेले पर्णफुले यामुळे वेताळवाडीच्या जंगलाच्या सोंदर्यमध्ये मोठी भर पडली आहे.

रस्त्यांनी जाताना पायाखाली लागणारी हिरवी गवताची पाती आणि त्यातच परिसरात तयार झालेला गारठा पर्यटकांचे मन आकर्षून घेत आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या हाकेच्या अंतरावर वेताळवाडीचे जंगल आहे. या जंगलाला लागुनच रुद्रेश्वर लेणी, घटोत्कच लेणी आणि जवळच असलेला वेताळवाडीचा किल्ला, ही तीन प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना मोहिनी घालत भुरळ पाडत आहे.त्याही पेक्षा वेताळवाडीची हिरवळ आणि त्यात भर घालणारी अजिंठा डोंगराची हिरवळ मोहिनी घालून साद घालत असल्याने या जंगलाचे वैभव जगप्रसिद्ध झाले आहे,विदेशी पर्यटक या वेताळवाडीच्या हिरव्याशार जंगलाच्या प्रेमात पडले आहे.

जाण्याचा मार्ग-
या जगप्रसिद्ध जंगलाकडे जाण्यासाठी अजिंठा लेणीपासून फर्दापूर गावाजवळ आल्यावर सोयगावच्या दिशेने प्रवास करून सोयगाव वरून गलवाडा आणि त्यानंतर वेताळवाडीच्या जंगलात प्रवेश होतो.अजिंठा लेनिपासून केवळ 20 रु. भाडे दिल्यानंतर या जगप्रसिद्ध जंगलाचे दर्शन होते.

मेघांची गवसणी-
आधीच हिरवळीने भर पडलेल्या सोन्दर्यात या ठिकाणी दिवसभर अजिंठा डोंगराला मेघांनी घातलेली गवसणी या सोन्दर्यात मोठी भर पाडत असल्याने काळेशार ढग आणि पायाखाली असलेला हिरवा गालीचा यामुळे पर्यटकांचा या जंगलात राजेशाही थाट झाला आहे.

रंगबेरंगी पर्णफुले-
जंगलात बहरलेली रंगबेरंगी पर्णफुले जंगलाच्या सोन्दर्यात मोठी भर घालून,या फुलांचा मनमोहक सुगंध जंगलात दरवळत असल्याने वेताळवाडीचे एकमेव जिल्ह्यातील जंगल म्हणून ओळख निर्माण करत आहे.या जंगलातील वन्यप्राण्यांची उन्हाळ्यात बंद झालेली सैर व मुक्तसंचार पुन्हा सुरु झाला असल्याने या जंगलाचा काही भाग वनविभागाने प्रतिबंधित केला आहे.

Web Title: greenery on ajintha hill colorful flowers are also

टॅग्स