नांदेड : अट्टल चोरांची टोळी जेरबंद 

nanded1
nanded1

नांदेड : नांदेड व पुणे शहरात बॅग लिफ्टींग करणारी अट्टल चोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह साडेबारा लाखाचा एेवज जप्त केला. टोळीतील एकाला नांदेडातून तर तिघांना पुणे शहरात अटक केल्याची माहिती पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी दिली. 

शहराच्या शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीतून नवा मोंढा भागात असलेल्या सुपर मार्केटमधून चंद्रकांत बालाजी चिंतावार यांची 16 ऑगस्ट 2018 रोजी सहा लाख 90 हजाराची बॅग लंपास केली होती. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या चोरीचा तपास करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांना गुप्त माहिती मिळाली. यावरून त्यांनी आपल्या पथकाला सतर्क केले. पथकांनी नांदेड शहरातून संशयास्पद फिरणाऱ्या विलास दिगांबर पांचाळ (वय 23, रा. इकळीमोर ता. नायगाव) याला सोमवारी (ता. 21) रात्री ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने शिवाजीनगर व पुणे शहरातबॅग लिफ्टींग केल्याची कबुली दिली. एवढेच नाही तर त्याच्याकडून पोलिसांनी रोख एक लाख 80 हजार, एक लॅपटॉप, दोन मोबाईल आणि चिंतावार यांचे चोरीला गेलेल्या दागिण्यापैकी 22 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

तसेच त्याच्या पुणे येथील तीन मित्रांना पुणे शहर पोलिसांनी अटक केल्याचे एसपी जाधव यांनी सांगितले आहे. नांदेड व पुणे येथील दोन चोरीची कबुली विलास पांचाळ याने दिली आहे. त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.  
असा टाकला फासा नायगाव येथील एका हॉटेलवर काम करणारा विलास पांचाळ हा इकळीमोर येथील गरीब कुंटूबातील आहे. मात्र तो चोऱ्या करीत होता. चोरी झाली की मित्रांना पार्टी देणे, समोरच्याकडून चिल्लर पैसे परत न घेणे, कोरी करकरीत किंमती दुचाकी वापरणे यावरून पोलिसांना संशय आला. त्याच्यावर पाळत ठेवून स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली. अटक केलेल्या विलास पांचाळने हैद्राबाद, मुंबई, नागपूर, तिरूपती, दिल्ली असा विमानप्रवास केला. तसेच रेल्वेतून महागडा प्रवास केल्याचे पोलिसांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com