esakal | मानवी चुका खपवून घेणार नाही; धनंजय मुंडेंचा अधिकाऱ्यांना डोस

बोलून बातमी शोधा

Guardian Minister Dhananjay Munde
मानवी चुका खपवून घेणार नाही; धनंजय मुंडेंचा अधिकाऱ्यांना डोस
sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : लोकांचे जीव वाचविण्यात मानवी चुका समोर आल्या तर कोणाचीही गय केली जाणार नाही, असे खडे बोल पालकमंत्री धनंजय मुंडे (Guardian Minister Dhananjay Munde) यांनी अंबाजोगाईत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले. (Guardian Minister Dhananjay Munde has told the officials of construction department in Ambajogai that he will not tolerate human mistakes)

हेही वाचा: नगरचे जिल्हाधिकारी म्हणतात ‘तो’ साठा आणण्याबाबत कल्पनाच नव्हती!

श्री. मुंडे यांनी सोमवारी (ता. तीन) अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व तेलगाव (ता. माजलगाव) ट्रामा केअर सेंटरला भेटी दिल्या.

अंबाजोगाईत रुग्णसंख्या, उपलब्ध व शिल्लक बेड, रेमडेसिव्हिर इंजेक्शनची वितरण प्रक्रिया, ऑक्सिजन पुरवठा आदींबाबत माहिती घेऊन आणखी ५० ऑक्सिजन बेड वाढविण्याच्या सूचना श्री. मुंडे यांनी दिल्या. आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, वाल्मिक कराड, अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, स्वारातीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव, शल्यचिकित्सक विभाग प्रमुख डॉ. नितीन चाटे, बांधकामचे कार्यकारी अभियंता श्री. बनसोडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता संदीप चाटे, शिवाजी सिरसाट, दत्ता पाटील, विलास सोनवणे, रणजीत लोमटे उपस्थित होते.

हेही वाचा: दिलासादायक! औरंगाबाद येथील रुग्णसंख्येत आणखी घट

स्वारातीमधील स्पेशालिस्ट व अन्य डॉक्टरांची किमान दोन दोन तासांची सेवा लोखंडी येथील रुग्णालयास उपलब्ध करून द्यावी असेही त्यांनी सुचविले. येथील विद्युत पुरवठ्याच्या कामात बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. श्री. मुंडे यांनी तेलगावच्या ट्रामा केअर सेंटरला भेट देऊन ५० ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल उभे करण्याची सूचना केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. साबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चेतन आदमाने उपस्थित होते.