पेरणी संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन 

Guidance for farmers in respect of sowing
Guidance for farmers in respect of sowing

औरंगाबाद : शेतकऱ्यांना पेरणीची नवीन पद्धती सांगण्यासाठी आता सरकार, एनजीओ पाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेनेही पुढाकार घेतला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील 17 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पेरणीसह खते, कीटकनाशके फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याची माहिती व तज्ज्ञांचे मार्गदर्शन असलेले व्हिडिओ स्क्रीनच्या माध्यमातून दाखिवले जाणार आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष एम. ए. काबरा यांनी 'सकाळ'ला दिली. 

गावागावांत फिरणाऱ्या या व्हॅनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या 25 फेब्रुवारीपर्यंत ही व्हॅन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह जळगाव, धुळे, नगर, नाशिक, पुणे, नंदुरबार, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांत ही व्हॅन फिरणार आहे. शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी तांत्रिक बाबीची माहिती या स्क्रीनच्या माध्यमातून देण्यात येईल. खते, कीटकनाशके फवारणी करताना काय काळजी घ्यावी, यांचे तंत्र याविषयी तज्ज्ञांचे व्हिडिओतून मार्गदर्शन असणार आहे; तसेच नागरिकांना तज्ज्ञांचे व्हिडिओही शेअर करण्यात येणार आहेत. 

"ग्रामीण भागाची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी हा अनोखा उपक्रम आहे. शेतकरी हा बॅंकेचा प्रमुख खातेदार आहे. त्याचा उदरनिर्वाह असलेल्या शेतीसाठी बॅंकेतर्फे तांत्रिक मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आम्ही राज्यातील 17 जिल्ह्यांत राबविणार आहे.'' - एम. ए. काबरा, अध्यक्ष, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com