‘पेड गुरूं’नी थाटली गल्लोगल्ली दुकाने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

औरंगाबाद - सर्वच क्षेत्रांत गुरू परंपरा आहे. पूर्वी गुरूंकडून निखळ प्रेमापोटी मोफत सल्ला मिळायचा; मात्र आता पैसे घेऊन सल्ला देणाऱ्या बाजारू गुरूंची संख्या वाढली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गुरूंकडेही संशयानेच पाहिले जात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

औरंगाबाद - सर्वच क्षेत्रांत गुरू परंपरा आहे. पूर्वी गुरूंकडून निखळ प्रेमापोटी मोफत सल्ला मिळायचा; मात्र आता पैसे घेऊन सल्ला देणाऱ्या बाजारू गुरूंची संख्या वाढली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गुरूंकडेही संशयानेच पाहिले जात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, सामाजिक यासह अनेक क्षेत्रांत काम करताना कुणाचा ना कुणाचा सल्ला घेतला जातो. यामध्ये आपल्या आई-वडिलांनाच गुरूच्या ठिकाणी मानून काम करणाऱ्यांची संख्या तशी कमीच म्हणावी लागेल. त्यामुळे पैसे घेऊन सल्ला देणाऱ्यांनी अगदी गल्लीबोळांमध्ये दुकाने थाटली आहेत. अशा दुकानदार गुरूंकडे सल्ला मागणारेही कमी नाहीत.

ज्याला जसा परवडेल तशा गुरूंकडे धाव घेतली जाते. विशेष म्हणजे उच्चशिक्षित गुरूंचे नेमके काय आणि सल्ला कुठल्या प्रकारचा हवाय, त्यावर शुल्क अवलंबून असते. समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रातील गुरूंना तर खूपच चांगले दिवस आले आहेत. बऱ्याचदा संबंधित व्यक्‍ती आपले ऐकत नसेल तर त्याच्या गुरूंनाच मॅनेज करा, असाही काही ठिकाणी सल्ला दिला जातो. त्या सल्ल्यानुसार कृती केल्यानंतर यश आल्याचेही अनेकजण खासगीत सांगतात. जुन्या काळापासून गुरू-शिष्य अशी एकप्रकारची आगळीवेगळी परंपरा चालत आलेली आहे; मात्र जुन्या परंपरांना छेद देण्याची कामे सुरू आहेत. त्यातीलच हा प्रकार म्हणावा का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शिष्याचे भले व्हावे, या उदात्त हेतूने गुरू त्यास सल्ला देत असत. काळाच्या ओघात चित्र बदलले आहे. काळाची गरज लक्षात घेऊन गल्लेभरू गुरूंची वाढती संख्या हेच दर्शवीत आहे. त्यामुळे आता प्रेमाचा किंवा भावनेचा ओलावा असणारा सल्ला अपवादानेच मिळेल, असेच म्हणावे लागत आहे.

Web Title: gurupournima paid guru business