सुगावात दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी पकडला गुटखा

प्रशांत शेटे
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

चाकूर (लातूर) : सुगाव (ता. चाकूर) येथील गुटखाकिंग व्यापाऱ्याकडून साडेआठ लाख रूपयाचा गुटखा पकडल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.4) ग्रामस्थांनी आणखीन एक इंडिका कार मध्ये सुमारे दिड लाख रूपयाचा गुटखा पकडून अन्न अौषध प्रशासना विभागाच्या ताब्यात दिला आहे. 

चाकूर (लातूर) : सुगाव (ता. चाकूर) येथील गुटखाकिंग व्यापाऱ्याकडून साडेआठ लाख रूपयाचा गुटखा पकडल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.4) ग्रामस्थांनी आणखीन एक इंडिका कार मध्ये सुमारे दिड लाख रूपयाचा गुटखा पकडून अन्न अौषध प्रशासना विभागाच्या ताब्यात दिला आहे. 

सुगाव गावातील एक गुटखाकिंग व्यापारी अनेक दिवसापासून खुलेआम गुटख्याची विक्री करीत आहे. कर्नाटक राज्यातून गुटखा आणून लातूर, उस्मानाबाद या दोन जिल्हयात तो येथून गुटखा विक्रीसाठी पाठवितो. अवैद्य गुटखा विक्रीसाठी अनेक तरूणांना त्यांने यात गंडविले आहे. गावातील तरूण व्यसनाच्या आहारी जात असल्यामुळे ग्रामस्थांनी व्यापाऱ्यास गुटख्याची विक्री करू नकोस अशी वारंवार विनंती केली, तरीही गावात खुलेआम गुटखा विक्री होत असल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गावात गुटखा घेऊन आलेला एम. एच. १३ ए. एन. ६३५४ क्रमांकाचा टेम्पो पकडला.  अन्न व अौषध विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी याचा पंचनामा केला, आठ लाख ६४ हजार रूपयाचा गुटखा व सात लाख रूपये किमंतीचा टेम्पो त्यांनी जप्त केला आहे.

शनिवारी (ता.४) सकाळी पुन्हा या व्यापाऱ्याच्या घरातून गुटखा शिरूरअनंतपाळ तालूक्यात विक्रीसाठी जात असताना ग्रामस्थांनी पकडला. एम. एम. १२ जी. झेड. ३८३८ क्रमांकाच्या इंडिका कार मध्ये हा गुटखा जात होता. याची माहिती कळवूनही दुपार पर्यंत अन्न् अौषध प्रशासन विभागाचे अधिकारी गावात पोहचले नव्हते. ग्रामस्थांकडून उशिरापर्यंत अधिकाऱ्यांची प्रतीक्षा सुरू होती. गावात आणखी काही ठिकाणी गुटखा असल्याची चर्चा सुरू आहे. 

Web Title: gutka trapped by villagers in sugao latur