नांदेड : आखाडा बाळापूरात दिड लाखांचा गुटखा पकडला

विनायक हेंद्रे
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

येथील पोलिसांच्या पथकाने बुधवारी 
(ता. १८) पहाटे पाच वाजता दिड लाख रुपये किंमतीचा गुटखा व 
एक पिकअप व्हॅन जप्त केली आहे. नांदेड येथून हा गुटखा 
बाळापुरकडे आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी सुरु केली आहे. 

आखाडा बाळापूर ः येथील पोलिसांच्या पथकाने बुधवारी 
(ता. १८) पहाटे पाच वाजता दिड लाख रुपये किंमतीचा गुटखा व 
एक पिकअप व्हॅन जप्त केली आहे. नांदेड येथून हा गुटखा 
बाळापुरकडे आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी सुरु केली आहे. 

नांदेड येथून आखाडा बाळापूरकडे आज पहाटे गुटखा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, जमादार पंढरी चव्हाण, मुलगीर यांच्या रात्रीच्या  गस्तीनंतर पहाटे चार वाजल्यापासून मुख्य रस्त्यावर वाहनांची तपासणी सुरु केली होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एका पिकअप व्हॅनला थांबवून चौकशी सुरु केली. मात्र यावेळी चालकाला पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाही. चालकाकडून बनवाबनवीची उत्तरे  दिली जात असल्याचे लक्षात येताच हुंडेकर यांच्या पथकाने सदर वाहन ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा, सितार, विमल, आरएमडी नावाचा गुटख्याचे पोते असल्याचे आढळून आले.

या संदर्भात पोलिसांनी तातडीने अन्न व औषध 
प्रशासनाला या प्रकाराची माहिती दिली आहे. दरम्यान, हा गुटखा नांदेड येथून आखाडा बाळापूर येथे येत होता. 
मात्र चालकाकडून हा गुटखा वाशीम येथे नेला जात असल्याचे 
सांगितले जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून इतरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutkha caught in nanded city