पंधरा लाखांचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

जवळा बाजार - औंढा नागनाथ ते शिरड शहापूर मार्गावर नागेशवाडी फाटा येथे शुक्रवारी (ता. 28) सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी पंधरा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

जवळा बाजार - औंढा नागनाथ ते शिरड शहापूर मार्गावर नागेशवाडी फाटा येथे शुक्रवारी (ता. 28) सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी पंधरा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

वसमत परिसरातून एका ट्रकमध्ये गुटखा भरून हिंगोलीकडे जात असल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ट्रक थांबविला. त्यामध्ये गुटखा आढळून आल्याने पोलिसांनी ट्रक हट्टा पोलिस ठाण्यात आणला. त्यानंतर केलेल्या तपासणीत 47 पोती गुटखा आढळून आला. सायंकाळी उशिरापर्यंत गुटख्याच्या पोत्यांचे मोजमाप सुरू होते.

Web Title: Gutkha Seized Crime