परभणीत 18 लाखांचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

शहरातील रोशन खान मोहल्यातील गोल घुमटजवळील एका घरात साठा करून ठेवलेला प्रतिबंधित 18 लाख 30 हजार 868 रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत करून दोघांना जेरबंद केले. छापा टाकल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी प्र. शि. कच्छवे यांना पाचारण करण्यात आले.

परभणी - शहरातील रोशन खान मोहल्यातील गोल घुमटजवळील एका घरात साठा करून ठेवलेला प्रतिबंधित 18 लाख 30 हजार 868 रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत करून दोघांना जेरबंद केले. छापा टाकल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी प्र. शि. कच्छवे यांना पाचारण करण्यात आले. निरनिराळ्या कंपन्याचा गुटखा, सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळला. त्याची किंमत 18 लाख 30 हजार 868 रुपये आहे. याप्रकरणी शेख शफीक रफीक अहमद, सय्यद रईस सय्यद इलियास या संशयितांविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutkha Seized Crime

टॅग्स