गुटख्याच्या साठ्यासह एक लाख 77 हजार किमतीचा मुद्देमाल पकडला

file photo
file photo

पैठण : शहरात विक्रीसाठी येत असलेल्या मावा गुटख्याच्या साठ्यासह एक लाख 77 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पैठण पोलिसांनी बुधवारी (ता. 25) छापा टाकून पकडला. पैठण-शेवगाव या मार्गावर खुल्या कारागृहाजवळ ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, शासनाने बंदी घातलेला मावा गुटख्याचा साठा पैठण येथे घेऊन येत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सी. जे. गिराशे, पोलिस कॉन्स्टेबल लालचंद नागलोत, भाऊसाहेब वैद्य, दत्तात्रय इंगळे, किशोर गवळी यांनी पैठण-शेवगाव या मार्गावरुन कार (एमएच 14 एक्‍स 5721) येत असताना छापा टाकला व तपासणी केली असता त्यात मागील डिक्कीत मावा गुटख्याचा पोत्याच्या गोण्यांत भरलेला साठा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कार जप्त करून पाचजणांना ताब्यात घेतले.

मोहसीन असलम पठाण (वय 30), सलमान सलीम पठाण (वय 24), वशीम अशुलाल सय्यद (वय 32), सय्यद अकीब सय्यद शफिक (वय 22, रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव, जि. नगर) या चारजणांना अटक केली. दरम्यान, हा मावा गुटखा साठा जप्त केल्याची माहिती औरंगाबाद येथील अन्न व औषधी प्रशासन विभागाशी संपर्क साधून देण्यात आली. त्यानुसार अन्न व औषधी प्रशासन अधिकारी ज्योती जाधव यांच्या फिर्यादीनुसार अन्न सुरक्षा कायद्यान्वये भारतीय दंड विधानानुसार विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com