नळदुर्गमध्ये पकडला गुटखा भरलेला ट्रक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

नळदुर्ग - गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक नळदुर्ग पोलिसांनी शनिवारी (ता. 4) दुपारी तीनच्या सुमारास पकडला. ट्रकमधील गुटख्याची मोजणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू झाले नव्हते. लाखो रुपयांचा गुटखा असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

हैदराबादहून गुटखा भरून ट्रक (एमपी 09 एचएफ 6820) नगरकडे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी नळदुर्ग- तुळजापूर राज्यमार्गावरील गंधोरा (ता. तुळजापूर) गावाजवळ संबंधित ट्रक पकडला. ट्रक पोलिस ठाण्यात आणण्यात आला आहे. ट्रकमध्ये कोणता गुटखा आहे, किती किमतीचा आहे, याची नेमकी माहिती मिळू शकली नाही. सुमारे एक कोटी रुपयांचा गुटखा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: gutkha truck seized