अवकाळीसह पुन्हा गारपीट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

जालना - जालना तालुक्‍यातील विरेगावसह परिसरात आज अवकाळी पावसासह गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. या अस्मानी संकटामुळे आंबा आणि मोसंबीचे नुकसान झाले. जालना तालुक्‍यातील विरेगाव, वझर, धनोरा गावांसह परिसरातील सुमारे आठ ते दहा गावांना सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यानंतर सुमारे पाच मिनिटे गारपीट झाली. या वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.
Web Title: hailstorm in jalana