लातूर जिल्ह्यात गारपीट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

लातूर - जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी (ता. 6) दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. औसा तालुक्‍यातील किल्लारी, लामजना, भादा भागात गारपीट झाली. औसा, निलंगा, उदगीर तालुक्‍यात वीज पडून तीन जनावरे दगावली. औशात विजेची तार तुटून गायीचा मृत्यू झाला. दरम्यान, बाजार समितीतील शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. 

शहरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास किल्लारी, लामजना, बेलकुंड (ता. औसा) येथे गारांचा पाऊस झाला. याच तालुक्‍यातील नागरसोगा, बोरफळ शिवारातील शेतात पावसामुळे पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. 

औसा येथेही पावसाने हजेरी लावली. उदगीर, देवणी, निलंगा तालुक्‍यातही काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, हरभरा पिके अजूनही शेतातच काढून ठेवलेली आहेत. बाजारभाव चांगला मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटत आहे. मात्र, आज झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. उन्हाळी पिके तसेच, फळबागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. 

Web Title: Hailstorm in Latur district