परभणी जिल्ह्यात निम्मे क्षेत्र पेरणीविना

कैलास चव्हाण
गुरुवार, 5 जुलै 2018

परभणी जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर 15 दिवसाचा मोठा खंड पडला. त्यानंतर झालेल्या दमदार पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या होत्या.

परभणी - जिल्ह्यात पावसाअभावी चिंतेचे ढग जमा होत असून अजुनही निम्म्या क्षेत्रावरील पेरणी रखडली आहे. केवळ 49.81 टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याने खरिप हंगामाचे भवितव्य अंधातरी आहे.

परभणी जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर 15 दिवसाचा मोठा खंड पडला. त्यानंतर झालेल्या दमदार पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या होत्या. बहुतेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने बियाणे निघाले नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. आता मात्र 15 दिवसापासून पाऊस गायब झाला आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षीक सरासरी 774.62 मिलीमिटर असून आतापर्यंत केवळ 172.45 मिलीमिटर पाऊस झाला आहे. 5 लाख 21 हजार 870 हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून त्यातील केवळ 2 लाख 59 हजार 952 हेक्टरवर पेरणी झाली आहे. पाथरी, पूर्णा, सोनपेठ, परभणी तालुक्यात पेरणी 50 टक्केही झाली नाही. उगवलेल्या पिकांची स्थिती सध्या चांगली असली तरी आणखी पाऊस लांबल्यास पिके धोक्यात येऊ शकतात.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Half of the area in Parbhani district without sowing