अर्धा पावसाळा संपला तरी विहिरी, तलाव कोरडेठाक

बाबासाहेब ठाेंबरे
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

पीरबावडा (जि.औरंगाबाद)  : पीरबावडा (ता. फुलंब्री) परिसरात अद्यापही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. मॉन्सूनचे आगमन उशिरा होत परिसरात 23 जूनला पावसाला सुरू झाला. मात्र, परिसरात समाधानकारक व जोरदार पाऊस न पडल्याने जलाशये अद्याप कोरडी पडली आहेत. अर्धा ऑगस्ट महिना संपत आला.

मात्र, लहान-मोठे तलाव, प्रकल्प, विहिरी अद्याप कोरड्याठाक आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरातील सर्व तलाव, विहिरी, बोअर कोरडीठाक पडली होती. मागील दोन वर्षांपासून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. श्रावण महिना सुरू असून सुद्धा पीरबावडासह परिसरातील रांजणगाव, गिरसावळी, मारसावळी आदी गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

टॅंकरचे प्रस्ताव दाखल
पीरबावडासह गिरसावळी, मारसावळी, रांजणगाव, बाभूळगाव आदी गावांच्या ग्रामपंचायतीने टॅंकर सुरू करण्यासाठी फुलंब्री पंचायत समितीला प्रस्ताव दाखल केले आहेत. लवकर-लवकर टॅंकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
 
रांजणगाव परिसरात अद्याप जोरदार पाऊस न झाल्याने विहिरी, तलाव कोरडेच आहेत. तरी टॅंकर लवकर सुरू करण्यात यावे.
- सीमा कोंडके, सरपंच, रांजणगाव.

चार-पाच गावांचे टॅंकरला मुदतवाढीसाठी प्रस्ताव मिळाले असून सदरील प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.
- गणेश सुवर्णकार, पाणीपुरवठा विभागप्रमुख, पंचायत समिती, फुलंब्री.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half Rain Season Vained, Ponds Dried