तुलसी विवाहातच शुभमंगल

Nanded News
Nanded News

नांदेड : सण-उत्सव हे समाजामध्ये एकता नांदावी, संस्कृतीची जोपासना व्हावी, सामाजिक परिवर्तन घडावे, म्हणून वर्षानुवर्षे साजरे करण्याची परंपरा आजही समाजामध्ये रुढ आहे. त्यानुसारच जुना कौठा येथील नरोबा लक्ष्मी नृसिंह मंदिर संस्थानतर्फे दरवर्षी सामुदायिक तुलसी विवाहाचे आयोजन केले जाते. यंदाही हा सोहळा मंगळवारी (ता.१२ नोव्हेंबर) रोजी झाला असून त्यात एका गरीब कुटुंबातील जोडप्यांचा विवाह पारंपरिक पद्धतीने लावून देण्यात आला आहे.

मंदिराचे पुजारी स्वामी शंकर संभय्याअप्पा यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले की ‘‘जुना कौठा येथे नरोबाचे (नृसिंह) तीनशे वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिर आहे. कौठावासीयांसह पंचक्रोशीत भाविकांचे ते ग्रामदैवत आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक उपक्रमही याठिकाणी सातत्याने राबविले जातात. सर्व पुरुष-महिला एकत्र येऊन प्रत्येक सण-उत्सव हा एकोप्याने साजरा करण्याची परंपरा आजही कायम टिकून आहे. सामुदायिक तुलसी विवाह सोहळ्यामध्ये विवाहित झालेल्या जोडप्यांना संसारोपयोगी सर्व वस्तू देवून उपस्थित सर्व वऱ्हाडींच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात येते.

अशी झाली सुरुवात

मंदिर संस्थानतर्फे प्रत्येकवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला सामुदायिक तुलसी विवाहाचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यामध्ये २०१३ पासून अशोक दिलेराव व मारोतराव पासवाड यांनी गरीब कुटुंबातील जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधण्याचा उपक्रम सुरु केला. त्याला कौठा वासियांसह मंदिर संस्थाननेही बळ मिळाले. आतापर्यंत सात गरीब कुटुंबातील जोडप्यांचे शुभमंगल सामुदायिक तुलसी विवाहातून लावून देण्यात आलेले आहेत. यंदाही हा सोहळा मंगळवारी (ता.१२ नोव्हेंबर) रोजी साजरा झाला. या सोहळ्यामध्ये मारोती कांबळे (रा. कांजाळा, ता. लोहा जि.नांदेड) यांची कन्या अंजली व सुनीलराव भिसे (रा.दौड पुणे) यांचे चिरंजीव नागेश यांचा पारंपरिक पद्धतीने विवाहन लावून दिला आहे. 

महिलांमध्ये नवचैतन्याची निर्मिती

महिलांमधील कलागुणांना वाव मिळून त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे या हेतूने विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येत असते. मंगळवारी झालेल्या सामुदायिक तुलसी विवाहादरम्यान तुलसी सजावट स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात प्रथम उत्तरवार, द्वितीय ज्योती स्वामी व तृतीय मीनाबाई धोंडगे यांनी पारितोषिके पटकावली आहेत. त्यांना नगरसेवक राजू काळे, मंदिर विश्‍वस्त समितीचे अध्यक्ष गंगाप्रसाद काकडे, राजू गोरे, मारोती पासवाड, नागनाथ बोडके, बालाजी देऊळगावकर, पुजारी शंकर स्वामी आदींच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com