हापूसला मिळतेय विम्याचे कवच   

प्रकाश बनकर
रविवार, 26 मे 2019

  • विमा कवच आंबा उत्पादकांसाठी नैसगिक आपत्तीतून सावरणारे 
  • वाढत्या तापमानाने उत्पादनात घट 
  • पण हापूस सांगून दुसऱ्या कोणत्या आंब्याची विक्री पडू शकते महागात

औरंगाबाद : फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यांची देशभरासह जगभरात मागणी असते. कोकणातून हापुसचे मोठ्या प्रमाणवर उत्पादन होते. या उत्पादकांना सरकातर्फे विम्याचे कवच देण्यात आले आहे. हे विमा कवच आंबा उत्पादकांसाठी नैसगिक आपत्तीतून सावरत असते. यंदाही हापुसच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. मात्र विम्याच्या कवचामुळे आधार ठरणार असल्याची माहिती आंबा उत्पादक महासंघाचे अध्यक्ष संतोष आमरे यांनी रविवारी (ता. 26) सांगितले. 

कृषी उत्पन्न बाजार समितीत पणन महामंडळ आणि बाजार समितीतर्फे आंबा महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवानंतर पुन्हा कोकणातील काही शेतकरी अस्सल हापूस विक्रीसाठी बाजार समितीत दाखल झाले आहे. 29 मे पर्यंत हे व्यापारी आंबा विक्री करणार आहे. हापूस विषयी श्री. आमरे म्हणाले, हापूसच्या उत्पादनात मोठी घट झाली. मात्र सरकारने हापूसला विम्याचे कवच दिले आहे. सी. सी. काढतो. त्याचा फायदा एखादी योजना घोषित झाली तर होतो. शिवाय रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे व सिंधुदुर्ग भागात पिकणाऱ्या आंब्यालाच हापूस मानले जाते. हापूस म्हणून अन्य कोणता आंबा विक्री करत असेल तर त्याला कायद्याचे संरक्षण देऊन शिक्षेची तरतूदही केली आहे असल्याचेही ते म्हणाले.

hapus
 

यंदा राज्यातील सर्वच भागात तापमानाने उच्चांक गाठला. 42 ते 47 अंशांपर्यंत तापमान पोहोचले होते. याचा परिणाम आंबा उत्पादकांनाही बसला असून वाढत्या उष्म्यामुळे यंदा हापूसच्या उत्पादनात 70 टक्के घट झाल्याचे कोकणातील शेतकऱ्यांनी सांगितले. हापूस आंब्यासाठी साधारण 27 ते 32 अंश सेल्सिअस तापमान लागते. यंदा हे तापमान कोकणात प्रत्यक्षात 42 अंशांपर्यंत पोहोचले होते. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. 70 टक्के उत्पादनात घट झाल्याचा अहवाल प्रत्यक्षात कोकण कृषी विद्यापीठानेच दिल्याची माहिती हापूस आंबा उत्पादक महासंघाचे नियोजित अध्यक्ष संतोष आमरे यांनी येथे दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hapus mango business gets insurance security