साहित्यक्षेत्रातील नाराजी 'फेसबुक'वर...

सुशांत सांगवे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

लातुर : राज्य सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ समितीच्या पुनर्रचनेवरून साहित्य क्षेत्रातून आता नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. ही समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात गेल्याची नाराजी साहित्यिक प्रा. हरी नरके यांनी आपल्या 'फेसबुक'वरून व्यक्त केली आहे. तर साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांनी 'अपरिचित लोकांची समिती', अशा शब्दांत समितीच्या पुनर्रचनेबाबत खंत व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ समितीची नुकतीच पुनर्रचना केली आहे. प्रा.अविनाश डोळस यांच्यासह प्रकाश आंबेडकर, प्रा. जनार्दन वाघमारे, प्रा. आ. ह. साळुंखे, डॉ. बाबा आढाव, जनार्दन चांदूरकर, प्रा. जयसिंगराव पवार, प्रा. रमेश जाधव, प्रा. रावसाहेब कसबे, प्रा.दत्ता भगत, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, नितीन राऊत यांनाही समितीवरून कमी करण्यात आले. याबाबत आता साहित्यक्षेत्रातून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

हरी नरके यांनी तर आपल्या 'फेसबुक'वरून सरकारच्या नव्या निवडीबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे' असे २२ खंड प्रकाशित करणारी राज्य सरकारची ही ग्रंथ समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपुर्ण कब्ज्यात गेलेली आहे. तीन लेखक वगळता समितीतील सर्वजण आंबेडकरी तज्ञ म्हणून सरकारने घेतले आहे, असे नरके यांनी आपल्या फेसबुकवर लिहिले आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या समितीत अभ्यासक, विचारवंतांची गरज आहे; पण सरकारने नेमलेल्या या नव्या समितीत बहुतांश लोक विशिष्ठ विचारधारेची आहेत. त्यांचे काम कोणालाही माहिती नाही'

कुलगुरूंपासून संचालक पदापर्यंत सगळीकडेच सरकार आपल्या विचारधारेची माणसे नेमत आहे. तोच प्रकार या समितीच्या बाबतीत झाला आहे. अपरिचित लोकांची ही समिती आहे.
- प्रा. जनार्दन वाघमारे, साहित्यिक

Web Title: Hari Narke writes on Facebook account about condition in literature field