फुलंब्रीत हरिभाऊ बागडे यांच्या प्रचारास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

तालुका भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन रविवारी (ता. पाच) सकाळी हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रचाराचा प्रारंभ बोरगाव अर्ज येथील गणपतीचे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी तालुक्‍यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फुलंब्री (जि.औरंगाबाद ) : तालुका भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन रविवारी (ता. पाच) सकाळी हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रचाराचा प्रारंभ बोरगाव अर्ज येथील गणपतीचे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी तालुक्‍यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन झाल्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. बोरगाव अर्ज येथील जागृत गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. प्रास्ताविकात सभापती सर्जेराव मेटे यांनी विविध विकासकामांना उजाळा दिला. श्री.बागडे म्हणाले, ""गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या बळावर भाजपला जनता मतदान करून निवडून देईल. शेतकरी कर्जमाफी, स्वच्छतागृह, पीकविमा आदी योजनांच्या माध्यमातून भाजप सरकारने विकासकामे केली आहेत. विकासाचा दृष्टिकोन ठेवूनच आम्ही गोरगरिबांची कामे केली आहेत.'' याप्रसंगी उपमहापौर विजय औताडे, नगराध्यक्ष सुहास सिरसाठ, बाजार समिती सभापती चंद्रकांत जाधव, पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्या अनुराधा चव्हाण, जितेंद्र जैस्वाल, सभापती राधकिसन पठाडे, तारू मेटे, अश्‍फाक पटेल, योगेश मिसाळ, डॉ. सारंग गाडेकर, गजानन नागरे, नरेंद्र देशमुख, अजय शेरकर, नाथा काकडे, रोशन अवसरमल, नामदेव कोलते, मयूर कोलते, सविता वाघ, गोपाळ वाघ, विलास उबाळे, सांडू जाधव, विनोद मानकापे, रामेश्वर चोपडे, प्रभाकर सोटम, राम बनसोड, सुमित प्रधान, राजू तुपे, संजय त्रिभुवन, आबासाहेब फुके, गजानन इधाटे, नंदू कोलते आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शिवसेना भाजपसोबत ः ठोंबरे

शिवसेना ही संपूर्ण ताकदीनिशी भाजप - शिवसेना महायुतीच्या उमेदवारासोबत असून, हरिभाऊ बागडे यांची बाजू भक्कम झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना युतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे यांनी सांगितले.
-----

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haribhau Bagde Starts His Election Compaign