विरोधकांपुढे महापालिकेची नांगी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

औरंगाबाद - हर्सूल सावंगी येथे कचरा टाकण्यास भाजप नगरसेवकाकडूनच विरोध झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने नांगी टाकली. आता हर्सूल येथे प्रक्रिया करण्यात येणाऱ्या कचऱ्यावर मध्यवर्ती जकात नाका येथेच प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रविवारी (ता. २९) दिवसभरात हर्सूलकडे एकही कचऱ्याचा ट्रक पाठवला नाही. येथील कचऱ्यावर बायोकेमिकल फवारण्यात आले असून, काही दिवसांतच तो खतायोग्य होईल. त्यानंतर स्क्रीनिंग मशीनद्वारे या कचऱ्याचे कंपोस्ट खत तयार होईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

रस्त्यांवर पडलेला कचरा उचलून तो मध्यवर्ती जकात नाका येथे साठविण्यात आला आहे. यापैकी सुमारे ७० ते ८० ट्रक कचरा मागील दोन दिवसांत हर्सूल-सावंगी येथील नियोजित जागेत हलविण्यात आला. अजून किमान ७० ट्रक कचरा येथे पडून आहे. हा कचरा हर्सूल-सावंगीत हलविला जात असतानाच भाजपचे नगरसेवक पूनम बमणे व त्यांच्या समर्थकांनी शनिवारी कडाडून विरोध करीत दगडफेक केली. त्यामुळे तेथे कचरा टाकण्याचे बंद करण्यात आले असले तरी आधी टाकण्यात आलेल्या कचऱ्यावर रविवारी प्रक्रिया करणे सुरू केले आहे.

तथापि, उर्वरित कचऱ्यावर हर्सूल सावंगीऐवजी मध्यवर्ती जकात नाका येथेच प्रक्रिया करून त्याचे कंपोस्टिंग केले जाणार आहे. दरम्यान, हर्सूल-सावंगीत कचरा टाकणे सध्या थांबवले असले तरी नियोजित जागेतच तिथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्लॅंट उभारण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 

Web Title: harsul savangi garbage depo municipal corporator oppose