पेयजल योजना मंजूर होउनही करावी लागते पाण्यासाठी भटकंती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

पैठण तालुक्‍यातील आडूळजवळ सुमारे 22 हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या गेवराई बुद्रूक येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते.

औरंगाबाद - उशाला जायकवाडी धरण, गावासाठी चार वर्षांपुर्वी राष्ट्रीय पेयजल योजना मंजुर झालेली आहे. असे असतानाही लहान मुलांपासून ऐंशी पंचाऐंशी वर्षांच्या वृद्धांना पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते अशी व्यथा गेवराई बुद्रूक येथील ग्रामस्थांनी बुधवारी (ता. 2) मांडली.

पैठण तालुक्‍यातील आडूळजवळ सुमारे 22 हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या गेवराई बुद्रूक येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. आगलावी गेवराई म्हणुनही हे गाव ओळखले जाते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांच्या मतदार संघातील या गावाच्या पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली. बुधवारी (ता. 2) जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब निर्मल पाटील यांच्या नेतृत्वात हंडे घेउन या गावाच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद गाठली. मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांची भेट घेउन त्यांच्यापुढे आपली व्यथा मांडली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Have to walk for water when drinking water scheme get approved