esakal | खळबळजनक ! महाराष्ट्रात पोहोचला Bird Flu, मुरूंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच
sakal

बोलून बातमी शोधा

खळबळजनक  ! महाराष्ट्रात पोहोचला Bird Flu, मुरूंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच

मुरुंबा येथे 800 कोंबडयाचा अचानक मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती

खळबळजनक ! महाराष्ट्रात पोहोचला Bird Flu, मुरूंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी, ता. 11  :  मुरुंबा (ता. परभणी) येथे 800 कोंबडयाचा अचानक मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या मृत पावलेल्या कोंबड्या चा अहवाल प्राप्त झाला असून त्यांचा मृत्यू  'बर्ड फ्लू'मुळेच झाला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. 

मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा अज्ञात रोगाने मृत्यु झाला होता. जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभागाने तात्काळ गावात धाव घेऊन उपायोजना करित पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल रविवारी (ता. 11)  रात्री उशिरा जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. त्यात 'बर्ड फ्लू' मुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

महाराष्ट्रभरातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

गावात उपाययोजना करण्यात येत आहेत. एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले असून गावातील दहा किलोमीटर परिसरात कुकूट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतुक, बाजार व जत्रा, प्रदर्शन तसेच पशुपक्ष्यांच्या अवागमनास बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. मुरूंबा (ता.परभणी) गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात पशूसंवर्धन विभागाकडून सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले. 

havoc of bird flu in maharashtra more than 800 chicken died due to bird flu in parabhani

loading image
go to top