मटका बंदसाठी चक्क तो चढला टाॅवरवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

औरंगबाद : कन्नड तालुक्यातील चापानेर येथील दादा पवार ( 45 वर्षे) हे मटका बंद करणे, पोलीस जमादार यांची बदली करण्यासह इतर मागण्यांसाठी गुरुवारी (ता.14) सकाळी सुमारे सहा वाजेपासून गावातील  मोबाईल टॉवरवर चढल्याने गावासह पोलिसांची सकाळपासून चांगलीच धावपळ झाली.

दादा पवार यांनी टॉवरवर चढण्यापूर्वी खाली एक चिठ्ठी चिटकवली असून त्यात लिहिले आहे की,माझ्या कडून मटका चालवण्यास शिकलेला शिरसगाव येथील व्यक्ती करोडपती झाला.आता मला मटका चालवण्याचे बुक देत नाही.त्याचा मटका बंद करण्यात यावा,तसेच तेथे कार्यरत कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस जमादारची कन्नड तालुक्यातून बदली करण्यात यावी व इतर मागण्या नमूद केल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नेवसे यांनी चापानेर गाठून सदर व्यक्ती बरोबर फोन वरून चर्चा केली.सदर व्यक्तीने टॉवरवर जाताना सोबत फोन नेल्याने त्याच्याशी चर्चा करणे शक्य असल्याने अनुचित प्रकार घडणार नाही अशी गावकरी व पोलिसांना आशा आहे.सदर प्रकरणात त्याला मनवुन खाली उतरवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He climbed to the tower to close the mat

फोटो गॅलरी