मटका बंद करण्यासाठी 'तो' चढला टॉवरवर

tawer.jpg
tawer.jpg

चापानेर (औरंगाबाद) : कन्नड तालुक्यातील चापानेर येथील दादा पवार (वय 45) हे मटका बंद करणे, पोलिस जमादार यांची बदली करणे सह इतर मागण्यांसाठी गुरुवारी सकाळी सुमारे सहा वाजेपासून गावातील बीएसएनएल मोबाईल टॉवरवर चढल्याने गावासह पोलिसांची सकाळपासून चांगलीच धावपळ झाली.

दादा पवार यांनी टॉवरवर चढण्यापूर्वी खाली एक चिठ्ठी चिटकवली असून, त्यात लिहिले आहे की, माझ्याकडून मटका चालवण्यास शिकलेला शिरसगाव येथील व्यक्ती करोडपती झाला. आता मला मटका चालवण्याचे बुक देत नाही. त्याचा मटका बंद करण्यात यावा, तसेच तेथे कार्यरत कन्नड ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस जमादारची कन्नड तालुक्यातून बदली करण्यात यावी व इतर मागण्या नमूद केल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील नेवसे यांनी चापानेर गाठून सदर व्यक्तीबरोबर फोनवरून चर्चा केली. सदर व्यक्तीने टॉवरवर जाताना सोबत फोन नेल्याने त्याच्याशी चर्चा करणे शक्य असल्याने अनुचित प्रकार घडणार नाही अशी गावकरी व पोलिसांना आशा आहे. सदर प्रकरणात त्याला मनवून खाली उतरवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com