'हे राम, नथुराम' नाटकात औरंगाबादेत गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

शिवसैनिकांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना झोडपले
औरंगाबाद - शिवसेनेने आयोजित केलेल्या "हे राम नथुराम' या नाटकाच्या सादरीकरणात घोषणाबाजी करून अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या दोन जणांना शिवसैनिकांनी झोडपून काढले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज "हे राम नथुराम' या नाटकाचे शनिवारी (ता.21) सिडकोतील जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी हा गोंधळ झाला. संभाजी ब्रिगेडचे राहूल बनसोड यांच्यासह तिघेजण तिथे आले होते. त्यांनी नाटकाला विरोध दर्शवत घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीला चोख प्रत्युत्तर देत शिवसेना कार्यकर्त्यांना राहूल बनसोडसह दोघांना चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात नाटकाचा प्रयोग पार पडला.

Web Title: he ram nathuram drama disturbance in aurangabad