हिंगोली : लाच प्रकरणात जमादार बडतर्फ

head constable suspended in the bribe case at Hingoli
head constable suspended in the bribe case at Hingoli

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास चांगला करून चार्जशीट दाखल करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जमादाराला सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी मंगळवारी (ता. 25) काढले आहेत.

सेनगाव तालुक्यातील गुगुळ पिंपरी येथे ता. 27 मे ला वाद झाला होता. या प्रकरणात एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास चांगला करून चार्जशीट लवकर दाखल करण्यासाठी गोरेगाव पोलिस ठाण्याचे जमादार देविदास शेळके याने तक्रारदारास एक हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी संबंधित तक्रारदारांनी हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर मंगळवारी (ता. 18) हिंगोली येथील बसस्थानकाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये सदर रक्कम घेताना त्‍यास 
लाचलुचपत विभागाचे उपाध्यक्ष हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक 
नितीन देशमुख, जितेंद्र पाटील जमादार अभिमन्यू कांदे, श्री. आढाव, विजय उपरे, संतोष दुमाने, रुद्रा कबाडे, जमीर शेख विनोद देशमुख, अविनाश कीर्तनकार, प्रमोद थोरात, श्री. बामणीकर यांच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

दरम्‍यान, या प्रकरणात जमादार शेळके यास सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी काढले आहेत. लाचखोर कर्मचाऱ्यांविरूद्ध पोलिस अधीक्षकांनी घेतलेल्‍या कडक भूमिकेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com