मुख्याध्यापकाची बोरीत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

बोरी (ता. जिंतूर) - मानसिक तणावामुळे मुख्याध्यापक पंढरीनाथ गणपतराव घोगरे (वय 45) यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 17) सकाळी उघडकीस आली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे ते मानसिक तणावात होते, असे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या कानड (ता. सेलू) येथील शाळेत ते कार्यरत होते. यासंदर्भात प्रवीण घोगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार बोरी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली.
Web Title: headmaster suicide