आरोग्य केंद्रावर गैरहजर अधिकारी तत्काळ निलंबित - डॉ. दीपक सावंत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

औरंगाबाद - राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर यापुढे ऑन ड्यूटी गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी विधान परिषदेत केली.

औरंगाबाद - राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर यापुढे ऑन ड्यूटी गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी विधान परिषदेत केली.

आमदार चव्हाण यांनी सूचना उपस्थित करून औरंगाबाद जिल्ह्यातील नाचनवेल, विहामांडवा, सावळदबारा, शिवना, लिंबाजी चिंचोली या प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधांचा तीव्र तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांचे औषधांअभावी हाल होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अधिकारी, कर्मचारी वेळेवर हजर नसल्याने अनेक महिलांची प्रसूती आरोग्य केंद्रांच्या गेटबाहेरच झाल्याचे उदाहरण तारखेसहित आमदार चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उशिरा येणाऱ्या, गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला. यावर आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, की प्राथमिक आरोग्य केंद्रांवर एखादी महिला प्रसूतीसाठी आली व त्या वेळी संबंधित अधिकारी गैरहजर असेल, तर त्यांना तत्काळ निलंबित करण्यात येईल. तसेच त्या अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी एमएमसीकडे शिफारस केली जाईल.

Web Title: health center absent officer suspend crime dr. deepak sawant