मराठवाड्यातील जमिनीत सेंद्रीय कर्बाचे प्रमाण ०.३० टक्क्यांखाली

कृष्णा  जोमेगावकर
रविवार, 29 एप्रिल 2018

नांदेड येथील राष्ट्रीय केमिकल अॅंड फर्टीलायझर्स लिमीटेडच्या (आरसीएफ) माती परिक्षणातून ही बाब पुढे आली. येथील माती परिक्षण प्रयोग शाळेत २०१६ - १७ मध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माती नुमन्याचे मोफत परिक्षण करुन त्यांना जमिन आरोग्य प्रत्रिकेचे वाटप करण्यात आले.

नांदेड : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांत जमिनीतील सेंद्रीय कर्ब ०.३० टक्क्यांच्या खाली आले आहे. यामुळे जमिनी नापिक होऊन उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यासोबतच क्षारपट जमिनीचे प्रमाण वाढून स्फुरदाचे प्रमाणही घटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नांदेड येथील राष्ट्रीय केमिकल अॅंड फर्टिलायझर्स लिमिटेडच्या (आरसीएफ) माती परिक्षणातून ही बाब पुढे आली. येथील माती परिक्षण प्रयोग शाळेत २०१६ - १७ मध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माती नुमन्याचे मोफत परिक्षण करुन त्यांना जमिन आरोग्य प्रत्रिकेचे वाटप करण्यात आले. यात मुख्य अन्नद्रव्य - नत्र, स्फुरद, पालाशचे दहा हजार नमुने तर लोह, तांबे, जस्त, मॅग्नीज या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे दीड हजार नमुने तपासून समिनीची सामू, क्षारता व सेंद्रींय कर्बाची तपासणी करण्यात आली. यात चार हजार ८८८ नमुन्यात सेंद्रीय कर्बाचे प्रमाण ०.३० टक्क्यांच्या खाली तर पाच हजार ३१ नमुने मध्यम प्रमाणात आले.

केवळ ८१ नमुन्यात सेंद्रीय कर्बाचे प्रमाण अधिक आढळले. या सोबत मुख्य अन्न घटक असलेले स्फुरदचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. दहा हजार मातीच्या नमुन्यापैकी आठ हजार ३५ नमुन्यात स्फुरदचे प्रमाण कमी आढळले आहे. या भागात खारपट जमिनीच्या प्रमाणातही वाढ होत आहे.

जमिनीतील विम्लाचे प्रमाण ८.५ च्या पूढे गेल्यामुळे जमिन खारपट होऊन पिकांना अन्नदव्याची उपलब्धता होत नसल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता शेती विषयातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. 

Web Title: The Health of Land Reducing Marathwada