esakal | आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते अद्ययावत फिरत्या रुग्णालयाचे लोकार्पण
sakal

बोलून बातमी शोधा

rajesh tope

जालन्यात टोपे यांच्या हस्ते अद्ययावत फिरत्या रुग्णालयाचे लोकार्पण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना: आयसीआयसीआय बँकेमार्फत सीएसआर फंडातून जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या अत्याधुनिक दोन फिरत्या रूग्णालयाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते रविवारी (ता.१२) जिल्हा रूग्णालयाच्या प्रांगणात करण्यात आले.

हेही वाचा: उस्मानाबाद जिल्ह्याची औषधविक्री व्यवस्था रामभरोसे?

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ.पद्मजा सराफ, डॉ.प्रताप घोडके, कौस्तुभ बुटाला, प्रतिमा खांडेकर आदींची उपस्थिती होती

यावेळी पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या सीएसआर फंडातून जालना जिल्ह्यासाठी अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त दोन फिरते रूग्णालय उपलब्ध करून दिले आहेत. या फिरत्या दवाखान्यामध्ये अत्याधुनिक उपकरणे, औषधी तसेच डॉक्टर उपलब्ध आहेत.

त्यामुळे या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागामध्ये नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. या फिरत्या दवाखान्याला जीपीएस यंत्रणा असल्यामुळे जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे, याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांना मिळणार असल्याचे सांगत या फिरत्या दवाखान्यांचा उपयोग गोरगरीब जनतेसाठी व्हावा, अशी अपेक्षाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.

loading image
go to top