राजेंद्र जंजाळ यांच्या  अर्जावर सुनावणी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

औरंगाबाद - नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांच्या जामीन अर्जावर प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांच्या न्यायालयात शनिवारी (ता. १९) सुनावणी पूर्ण झाली. सदर प्रकरण न्यायालयाने आदेशासाठी राखून ठेवले आहे. त्यावर सोमवारी (ता. २१) आदेश होण्याची शक्‍यता आहे. 

जंजाळ यांच्यावतीने न्यायालयास विनंती करण्यात आली, की जंजाळ हे नगरसेवक असून प्रतिष्ठित नागरिक आहेत. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून, जंजाळ यांच्याकडून कोणतेही हत्यार जप्त करण्यात आले नाही. त्यांना जामीन मंजूर करावा. 

त्यावर जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी जामीन अर्जास विरोध केला. त्यांनी तपासाची  कागदपत्रे न्यायालयात सादर केली. गुन्हा घडविण्याचा काय उद्देश होता, आरोपीने कोणते साहित्य वापरले, अन्य कोणी साथीदार आहेत काय, दंगल घडवून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करत अशांतता निर्माण  करण्याचा काय उद्देश आहे आदींचा तपास करायाचा आहे. आरोपीकडून घटनेच्यादरम्यानचे कपडे जप्त करावयाचे आहेत. त्यामुळे जामीन मंजूर करू नये, अशी विनंती त्यांनी केली. जंजाळ यांच्यावतीने ॲड. अशोक ठाकरे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. सचिन शिंदे, ॲड. अभयसिंह भोसले व ॲड. विष्णू मदन पाटील यांनी सहकार्य केले. 

फेरोजखान यांचाही अर्ज दाखल
शनिवारी (ता. १९) एमआयएमचे फेरोज खान यांच्यातर्फे जामीन अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर सोमवारी (ता. २१) प्रभारी सत्र न्यायाधीश गोसावी यांच्या न्यायालयात सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. त्यांच्यावतीने ॲड. खिजर पटेल काम पाहत आहेत.

Web Title: Hearing on rajendra janjal