जालन्यात ह्रदय पिऴवटून टाकणारी घटना, खदाणीत बहिणभाऊ बुडाले  

drown_5_0.jpg
drown_5_0.jpg

अंकुशनगर (जालना) : अंबड तालुक्यातील वाळकेश्वर येथील मुरुमाच्या खदानीत शनिवारी (ता.२४) दुपारी साडेचार वाजता पोहण्यासाठी उतरलेल्या लहान बहिणभावाचा बुडून मृत्यू झाला. आदित्य संदीप उनवणे (वय ११) व आदिती संदीप उनवणे (वय ९) असे त्यांचे नाव आहे. 

गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथील संदीप उनवणे यांच्यासह कुटुंब सालगडी म्हणून वाळकेश्‍वर परिसरात काम करते. दरम्यान, शनिवारी आई व वडील शेतात कामासाठी गेलेले होते. तेव्हा शेताजवळ असलेल्या मुरुमाच्या खदानीत पोहण्यासाठी आदित्य, आदितीसह तिची लहान बहीण गेले. तेव्हा खदानीत उतरलेले आदित्य व आदिती दोघेही पाण्यात बुडाले.

हे पाहून वर थांबलेल्या छोट्या बहिणीने आरडाओरडा केला. त्यानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघा बहिणभावांना बाहेर काढले, दवाखान्यात हलविले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, दोघांना अंत्यसंस्कारासाठी सुरळेगावला नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शहागड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com