नांदेडला उष्माघाताचा आणखी एक बळी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नांदेड - उष्माघाताने येथील एका मिस्त्री कामगाराचा मृत्यू झाला. माधव हरिभाऊ सूर्यवंशी (वय 38, रा. क्रांती चौक, सिडको, नांदेड) असे त्यांचे नाव आहे. मंगळवारी (ता. 18) दुपारी अचानक चक्कर आल्याने ते कोसळले. सहकाऱ्यांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यात उष्माघाताचा हा तिसरा बळी आहे. याच आठवड्यात उमरी तालुक्‍यात एकाचा तर गेल्या महिन्यात किनवट तालुक्‍यातील एकाचा मृत्यू झाला आहे. 

Web Title: A heat stroke victim