परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट २९ पर्यंत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून रविवारी (ता. २६) कामाल तापमानाचा पारा ४६ अंशांवर गेला. उष्णतेची लाट २९ मेपर्यंत कायम राहणार असून तापमान ४५ अंशांपर्यंत राहील, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला. 

परभणी - जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून रविवारी (ता. २६) कामाल तापमानाचा पारा ४६ अंशांवर गेला. उष्णतेची लाट २९ मेपर्यंत कायम राहणार असून तापमान ४५ अंशांपर्यंत राहील, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला. 

वाढत्या तापमामाने दोन महिन्यांपासून परभणी जिल्ह्याची होरपळ सुरू आहे. कमाल तापमान सातत्याने ४३ ते ४५ अंशांच्या आसपास राहत असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. दिवसभर कडक उन्हाचे चटके आणि रात्री उष्ण वारे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन आठवड्यांपासून पारा ४५ अंशांच्या पुढे असून आज तो ४६ अंशांवर पोचला.

शहरनिहाय कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये असे ः नांदेड ४४, बीड, हिंगोली ४३, लातूर ४१, जालना ४२.९.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The heat wave in Parbhani district till 29th