लोहारा येथे उष्माघाताने सोळा दिवसांच्या बालिकेचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

लोहारा -शहरातील एका 23 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (ता. 19) सांयकाळी पाचच्या सुमारास एका सोळा दिवसांच्या बालिकेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहरातील उष्मघाताचा हा दुसरा बळी ठरला आहे. 

शहरातील इंदिरानगर भागातील मंगेश दत्ता लोहार या सुतारी व्यवसाय करणाऱ्या तरुणाचा सोमवारी उष्माघाताने मृत्यू झाला होता. दिवसभर रखरखत्या उन्हात तो काम करीत होता. ही घटना ताजी असतानाच बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शहरातील रवी इंगळे यांच्या 16 दिवसांच्या बालकास जुलाब होत असल्याने त्यास खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. बालकाच्या अंगातील पाण्याचे प्रमाण कमी झाले होते; तसेच जुलाब होत होते. ही लक्षणे उष्माघाताची असून, त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे डॉ. चंद्रशेखर हंगरगेकर यांनी सांगितले. लोहारा शहरातील उष्मघाताचा हा दुसरा बळी ठरला आहे. 

Web Title: Heatstroke death of child

टॅग्स