मराठवाड्यात रविवारी, सोमवारी अतिवृष्टीचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जून 2016

किमान 70 ते 110 मिलिमीटर पाऊस पडण्याचा अंदाज
औरंगाबाद - मराठवाड्यात रविवारपासून (ता.19) पुढील चोवीस तासांत जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या कालावधीत 70 ते 110 मिलिमीटर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.

यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद यांसह उत्तर कोकण, दक्षिण कोकण-गोवा, उत्तर-मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, पश्‍चिम विदर्भ, पूर्व विदर्भात 19 जुलैपासून पुढील चोवीस तासांत जोरदार पाऊस पडेल. सुमारे सात सेटिंमीटर ते 11 सेटिंमीटरपर्यंत (70 ते 110 मिलिमीटर) हा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

सतरा दिवसांत जिल्ह्यात सरासरी 5.14 मिलिमीटर पाऊस
जून महिन्यात आतापर्यंत दोन-चार दिवस पडलेल्या हलक्‍या सरींचा पाऊस वगळता इतर दिवस कोरडेच गेले आहेत. मागील सतरा दिवसांत जिल्ह्यात केवळ सरासरी 5.14 मिलिमीटर पाऊस पडला आहे. यंदा पैठण तालुक्‍यात आतापर्यंत सर्वाधिक (32.20 मिलिमीटर) पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय सोयगाव तालुक्‍यात 4.33, औरंगाबाद 3.20, गंगापूर 2.78, खुलताबाद 1 आणि वैजापूर तालुक्‍यात 0.90 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात पेरणीची कामे खोळंबली असून, शेतकऱ्यांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

Web Title: heavy rain in aurangabad