भोकरला दमदार पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

भोकर : मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पावसाळ्यातही ऊन व उकाड्याने जनता हैराण झाली होती. बळीराजा ही चिंतेत होता. दोन नक्षत्र कोरडे गेल्याने सर्वाच्या नजरा आकाशाकडे लागून होते. शनिवारी (ता. 29) दुपारी दमदार पाऊस झाल्याने जीव भांड्यात पडला आहे.

मागील पावसाळ्यात पोळ्याला चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र  पावसाने दडी मारली. उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेनी जनता होरपळून निघाली. पावसाळा जवळ आल्याने शेतकरी खरीपाची पूर्व पावसाळी कामे अटोपून आकाशाकडे टक लावून बसला. रोहिणी, मृगनक्षत्र बरसलाच नाही. पेरण्या खोळबंल्या काही भागात धूळपेरणी झाली. बागायतदारांनी ठिबक, तुषाराचा आधार घेत लागवड केली. कोरडवाहू शेती चे मातेर झाल .हवामान विभागाचे अंदाज चूकीचे ठरले. सा-यांनाच हवाहवासा वाटणारा पाऊस दोन दिवसापासून अधूनमधून हजेरी लावल्याने बळीराजा काहिसा सुखावला आहे.

शनिवारी दुपारी शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. सखल भागात पाणी साचले. बाजारपेठत कृषी व्यापारी पावसा अभावी व्यापार मंदावल्याने नाराज होते. आता पावसाला सुरूवात झाली असली तरी खरीपासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे. तालुक्यात आतापर्यंत तीनसे मीलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in Bhokar Marathwada