लोहारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; वीज पडून तीन जनावरं दगावली

जेवळी परिसरात गेल्या चार - पाच दिवसांपासून अधून मधून वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय
heavy rain
heavy rainheavy rain

जेवळी (उस्मानाबाद): जेवळी व परिसरात बुधवारी (ता.५) दुपारी तीनच्या सुमारास वादळी वारा (heavy rain), मेघगर्जनेसह अर्धा तास जोरदार पाऊस झाला. यावेळी परिसरात तीन ठिकाणी वीज पडून तीन जनावरे दगावली आहेत.

जेवळी परिसरात गेल्या चार - पाच दिवसांपासून अधून मधून वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय (lohara rain updates). बुधवारी (ता.५) दुपारी मात्र प्रचंड मेघगर्जनेसह अर्धा तास जोरदार पाऊस झाला. यावेळी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून तीन जनावरे दगावली आहेत.

heavy rain
धक्कादायक! उस्मानाबादमध्ये आढळला जळालेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह

जेवळी येथे बस स्थानक परिसरात भर वस्तीत झाडाखाली बांधण्यात आलेली भास्कर दूधभाते यांचे खोंड, जेवळी पूर्व तांडा येथील बाबू जाधव यांची शेतात झाडाखाली बांधलेली मुरा जातीची म्हैस तर भोसगा येथील लक्ष्मण जळकोटे यांचं शेतात झाडाखाली बांधलेली गाय वीज पडून ठार झाली आहे. अशी माहिती जेवळी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ हणमंत जगताप यांनी दिली आहे. यावेळी पावसाबरोबरच मोठ्या प्रमाणात मेघगर्जना झाली या मेघगर्जनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पावसाने परिसरात फळपिकांचे नुकसान झाले असून यावेळी गाावातील रस्त्यावरून काही प्रमाणात पााणी वाहीलेे आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com