जालना : बारा मंडळात मुसळधार पाऊस

rain-jalana.jpg
rain-jalana.jpg

जालना : जिल्ह्यात पावसाने लगत पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी (ता. 22) रात्री पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. परिणामी बुधवारी (ता. 23) सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोविस तासांमध्ये जिल्ह्यात 48.75 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तर जिल्ह्यातील तब्बल दहा  मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. यातील दोन मंडळाने तर शंभरी पार केली आहे.
जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून सतत पावसाच्या सरी कोसळत आहेत. मंगळवारी (ता. 22) रात्री झालेल्या पावसामुळे जालना तालुक्यातील वाघ्रुळ जहांगीर मंडळात तब्बल 110 मिलिमीटर पाऊस झाला.

तर रामनगर मंडळात 84 मिलिमीटर, विरेगाव मंडळात 94 मिलिमीटर, पाचनवडगाव मंडळात 65 मिलिमीटर, बदनापुर तालुक्यातील बावने पांगरी मंडळात 80 मिलीमीटर, भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार मंडळात 95 मिलिमीटर, पिंपळगाव  रेणुकाई मंडळात 73 मिलिमीटर, अनवा मंडळात तब्बल 130 मिलिमीटर, राजुर मंडळात 79 मिलिमीटर, केदारखेडा मंडळात 81 मिलिमीटर, परतुर तालुक्यातील परतुर मंडळात 78 मिलिमीटर, अंबड तालुक्यातील वडीगोद्री मंडळात 98 
मिलिमीटर पावसा झाला आहे. तर जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी येथे 74 मिलिमीटर या बारा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 

दरम्यान, बुधवारी (ता. 23) सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात 48.75 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात जालना तालुक्यात 57.88 तर आतापर्यंत 556.62 मिलिमीटर, बदनापूर तालुक्यात 62 तर आतापर्यंत 634.80 मिलिमीटर, भोकरदन तालुक्यात 79.75 तर आतापर्यंत  893.22 मिलिमीटर, जाफराबाद 
तालुक्यात 48.20 तर आतापर्यंत 686.80 मिलिमीटर, परतूर तालुक्यात 40.90 तर आतापर्यंत  682.85  मिलिमीटर, मंठा तालुक्यात 6 तर आतापर्यंत  511.75 मिलिमीटर, अंबड तालुक्यात 58.71 मिलिमीटर तर आतापर्यंत 740.16 मिलि मीटर, घनसावंगी तालुक्यात 36 तर आतापर्यंत  642.18  मिलि मीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात बुधवारी (ता.23) सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यातील  49 मंडळांपैकी 28 मंडळात 50 मिली पक्षां अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यातील बारा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com