जालना जिल्ह्यातील चार मंडळात अतिवृष्टी

महेश गायकवाड
बुधवार, 3 जुलै 2019

जालना : जिल्ह्यात बुधवारी (ता. 29) सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासात सरासरी 22.56 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी (ता. 2) दिवसभरात शहरास जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने चार मंडळात अतिवृष्टी झाली. 

दोन दिवसाची उघडीप दिल्यानंतर मंगळवारी जिल्ह्यात काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्‍वरूपाचा पाऊस झाला. बुधवारी सकाळी आठपर्यंत 22.56 मिली मिटर  पावसाची नोंद झाली. यात जालना, राजुर, अनवा, भोकरदन, जाफराबाद या महसुली मंडळात 65 मिली मिटरपेक्षा जास्‍त पाऊस होऊन अतिवृष्टी झाली.  या पावसामुळे गेल्या आठवड्यात पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एक जून पासून ते बुधवारपर्यत जिल्ह्यात   सरासरी 104.59  मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in Jalna District

टॅग्स