लातूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

हरी तुगावकर  
गुरुवार, 7 जून 2018

लातूर : लातूर जिल्ह्य़ातील दहा तालुक्यात गुरुवारी पहाटे पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्य़ात सरासरी 28.43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 51.33 मिलीमीटर पाऊस शिरुर अनंतपाळ तालुक्यात झाला आहे. या वर्षीच्या मृग नक्षत्राला उद्या पासून सुरवात होत आहे. त्यात हा पाऊस झाला असल्याने वेळेत पेरण्या होतील याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.    

जिल्ह्य़ात जूनच्या सुरवातीपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यात गुरुवार पहाटे दहाही तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्य़ात सरासरी 28.43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये पुढील प्रमाणे आहे. लातूर 11.63,ओसा 30.29, रेणापूर 13.25, उदगीर 22.71, अहमदपूर 24, चाकूर 44.40, जळकोट 23, निलंगा 44, देवणी 19.67,शिरूर अनंतपाळ 51.33. या वर्षीच्या मृग नक्षत्राला उद्या पासून सुरवात होते आहे. जूनच्या पहिल्या दिवशी पासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात वेळेत खरीपाच्या पेरण्या होतील असे अपेक्षित आहे.

Web Title: heavy rain in latur district